वेताळ बांबर्डे उबाठा पक्षाचे शाखाप्रमुख पिंटू दळवी यांनी केलेली टीका नैराश्यातून..

आमदार वैभव नाईक यांना खुश करण्यासाठी पिंटू दळवींचा केविलवाणा प्रयत्न

वेताळ बांबर्डे माजी ग्रामपंचायत सदस्या संजना पाटकर यांचे प्रत्युत्तर

कुडाळ : काल वेताळ बांबर्डे माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासहित पाटकर कुटुंबीय व चव्हाण कुटुंबीय यांनी निलेश राणेंना पाठिंबा जाहीर करत भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यानंतर वेताळ बांबर्डे गावचे उबाठा शाखाप्रमुख यांनी आमचा उबाठाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगत भाजपला मदत केल्याचे आरोप धादांत खोटे असून ते नैराश्यातून केले गेले आहेत. असे प्रत्युत्तर वेताळ बांबर्डे माजी ग्रामपंचायत सदस्या संजना पाटकर यांनी दिले आहे.

मागील तीस वर्षे अगदी सुरेश प्रभूंच्या निवडणूकीपासून पाटकर कुटुंबीयांनी शिवसेनेचा गड राखला होता.आमदार वैभव नाईक नेहमी पक्ष वाढीसाठी आमच्या घरी हजेरी लावत असल्याचे फोटो आम्ही जाहीर केल्यास पिंटू दळवी राजकारण सोडणार आहेत का ? असा आमचा जाहीर सवाल आहे.आमच्या पाठिंब्यावर वेताळ बांबर्डे सरपंच पदी आपल्या पत्नी वेदिका दळवी व इतर सदस्य निवडून आले आहेत हे ध्यानात ठेवा. एवढी वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहून देखील एकही काम वाडीसाठी न केल्यानेच आम्ही वेगळा विचार केला आहे. असे प्रत्युत्तर संजना पाटकर यांनी शाखाप्रमुख पिंटू दळवी यांच्या टिकेला दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *