माई आजी…आमची आजी आमच्या पिढीला मिळालेला शेवटचा प्रेमळ…विसावा…

संचिता चव्हाण: माई शब्द उच्चारताच आईच्या मायेच्या स्पर्शाचा आभास झाला.सगळ्यांचा सांभाळ करणारी सगळ्यांना माया लावणारी,आपल्या ओंझळीतील प्रेम सगळ्यांना समान वाटणारी म्हणजे माई.आमच्या आजीला प्रेमाने लोक माई म्हणायचे. जसं तीच नाव अगदी तशीच आमची आजी म्हणजे माय होती.लेकराला पान्हा आणि पाखराला…
