मुख्यमंत्र्यांसह कोण घेणार शपथ नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदान येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर दिग्गज उपस्थित राहणार आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे व अजित पवार उपमुख्यमंत्री…
कुडाळ प्रतिनिधी माणगाव धरणवाडी येथील धारगळकर कुटुंबीयांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम मिळून सुमारे ६ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला. दिवसाढवळ्या काही कालावधीत झालेल्या या चोरीमुळे माणगाव खोऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. या…
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही कुडाळ : कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयानजिक विद्युतवाहिन्या कोसळल्या. परंतु त्यावेळी त्या ठिकाणी माणसांची उपस्थिती नव्हती. त्यामुळे सुदैवाने जीवित हानी टळली.
ऑटो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवलचे आयोजन विविध करमणुकीच्या कार्यक्रमांची मेजवानी कुडाळ : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गचा ऑटो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवल यावर्षी 28 ते 31 डिसेंबर या कालावधीत कुडाळ हायस्कूलच्या भव्य…
दोन तासांपासून वाहतूक ठप्प.. कणकवली : कोल्हापूर ते सिंधुदुर्ग येणारा भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल टँकर आज फोंडाघाटात पलटी होऊन अपघातग्रस्त झाला. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना घडली. अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने टँकर पलटी झाला. त्यानंतर टँकरने लगेच पेट…
महाराष्ट्रात उद्या आझाद मैदानात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती भाजप निरीक्षक विजय रुपानी यांनी दिली. भाजप विधिमंडळ गटनेते म्हणून फडणवीस यांची निवड एकमताने करण्यात आली. रुपानी म्हणाले की, भाजप हायकमांडशी चर्चा झाल्यानंतर मंत्रिमंडळ सदस्यांची नावे…
दिनांक 1 डिसेंबर 2024 ते दिनांक 15 डिसेंबर 2024 या कालावधीत जिल्ह्यात शाळा सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम आणि समुदाय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम घेण्यात येत असून सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक पुणे यांचे 20 जणांचे पथक जिल्ह्यात दाखल झाले…
मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचा दुजोरा. सिंधुदुर्ग : गेल्या लोकसभा निवडणुकीत कुडाळ मालवण मतदारसंघात मिळालेल्या मताधिक्याच्या तुलनेत विधानसभा निवडणुकी मिळालेले अल्प मताधिक्य याचा विचार करता, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचे म्हणणे योग्यच वाटते. अशी प्रतिक्रिया मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी…
कुडाळ : झाराप येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनवटीची दारू वाहतूक करणारा ट्रक पकडला. यामध्ये ६१ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राज्य…
कणकवली : मुंबई पोलिस दलात सहायक पोलिस उपनिरीक्षक पदावरुन स्वेच्छानिवृत्ती घेतलेले विनोद मधुकर आचरेकर (55) यांचा डोक्यात कुदळ मारून खून करण्यात आला होता. याप्रकरणी संशयित आरोपी सिद्धिविनायक ऊर्फ पप्पू संजय पेडणेकर (24, रा. कोळोशी, वरचीवाडी) याची पोलिस कोठडी संपल्याने मंगळवारी…