नाणोस गावात अनधिकृतरित्या सुरू असलेल्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन


सावंतवाडी : तालुक्यातील मौजे नाणोस गावातील डोंगराळ भागात ग्राम प्रशासनास कोणतीही लेखी सुचना न देता व गावातील ग्रामस्थांना विश्वासात न घेता फोमेंतो या कंपनीने अनधिकृत रित्या सुरू केलेल्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे काम दिनांक १३ डिसेंबर २०२४ च्या ग्रामसभेतील ठरावानुसार त्वरीत बंद करण्याचे आदेश संबंधित कंपनीला आदेश देण्यात यावेत, म्हणून ग्रामपंचायत नाणोस च्या व मायनिंग संघर्ष उप समिती नाणोसच्या वतीने जिल्हाधिकारी, श्री अनिल पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. तसेच खनिज कर्म विभागाचे प्रभारी अधिकारी सौ. सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

त्यावेळी सदर प्रकरणी संबधित अधिकारी यांना त्वरीत बोलावून माहीती घेतली,व सदर प्रकरणाची फाईल मागवून घेतली, फाईल मधील कागदपत्रांची पाहणी करून याबाबत आपण योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.


यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा मायनिंग संघर्ष उप समितीचे अध्यक्ष श्री. सागर नाणोसकर, ग्रा.पं .सदस्य श्री. विनायक शेट्ये, माजी सरपंच श्री. वासुदेव जोशी, माजी सरपंच श्री. राजाराम नाणोसकर आधी उपस्थित होते.

error: Content is protected !!