मुंबई प्रतिनिधी: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 97 वर्षीय आडवाणींची प्रकृती मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होती. शनिवारी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मागील 4-5 महिन्यांत चौथ्यांदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याआधी ऑगस्ट महिन्यात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीविषयी भाजप वर्तुळात चिंता व्यक्त होत आहे.