कुडाळ प्रतिनिधी: नेरुर विद्यामंदिर हायस्कूल विज्ञान प्रदर्शन पार पडला कुडाळ तालुक्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांचा नेरुर हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनास सहभाग घेऊन विज्ञान प्रदर्शन पार पडला. शालेय विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात विविध उपकरणे विज्ञान प्रदर्शनात आज सादर केले. लाईट प्रदर्शन, विद्युत उपकरणे प्रदर्शन, शेती विषयक प्रदर्शन, फळ काढणी यंत्र, आपत्ती व्यवस्थापन, भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान, आरोग्य आणि स्वच्छता प्रदर्शन असे विविध प्रदर्शने या प्रदर्शनात सादर करण्यात आली होती. या विज्ञान प्रदर्शनाला. केंद्र शाळा पिंगुळी नंबर एक या शाळेच्या वतीने प्रदर्शन दाखवण्यात आले होते. या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी शालेय कमिटी अध्यक्ष केंद्र शाळा पिंगुळी नंबर एक दीपक धुरी तसेच माजी पंचायत समिती सदस्य गंगाराम सडवेलकर यावेळी विज्ञान प्रदर्शनास दिली भेट.