मुंबईकरांसाठी लोकल्सचा प्रवास होणार सुखदायी

मुंबई मधे ३०० नव्या लोकल ट्रेन्स होणार दाखल

मुंबई प्रतिनिधी: मुंबईकरांची जीवन वहिनी म्हणजे लोकल ट्रेन मुंबईच्या प्रत्येक मेहनत करणाऱ्या माणसाच्या दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट हा लोकलनेच होतो. आता हाच लोकल चा प्रवास सुखकर होणार आहे. मोदी सरकारने मुंबईकरांसाठी खास गिफ्ट दिले आहे. मुंबईमध्ये 300 नव्या लोकल ट्रेन्स दिल्या जाणार आहेत. तसेच वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल्स उभारले जाणार आहे. माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.

3 मोठ्या परियोजनांना केंद्राने मंजुरी दिली आहे. पोर्ट कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यासाठी पूर्वांचल ते मुंबईलला जोडण्यासाठी कॉरीडोर तयार करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेतील परेल, एलटीटी, कल्याण आणि पनवेल या टर्मिनल्सची क्षमता वाढवण्यात येणारा आहे. रेल्वेने मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्थानकांची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जोगेश्वरीमध्ये नवी टर्मिनल्स आणि वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिलन्स उभारण्यात येणार आहे. मुंबई लोकल ट्रेन्समध्ये अतिरिक्त 300 ट्रेन्स जोडल्या जाणार आहेत.

error: Content is protected !!