प्रतिनिधी : संतोष हिवाळेकर
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले अन्नदान श्रेष्ठ दान असून, सर्वात मोठे नित्य अन्नदान होत आहे. न्यासाकडून होत असलेले स्वामी कार्य हे उल्लेखनीय असून, आम्हा सिंधुदुर्गकरांना अन्नछत्र मंडळ हे श्रद्धास्थान असल्याचे मनोगत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता, न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पुढे बोलताना ना. दीपक केसरकर म्हणाले की, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे हे कार्य सांगण्यासाठी माझ्याकडे खरोखरच शब्द नाहीत, या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांनी स्वामी भक्तांची जी सेवा करतात खरोखरच त्यांच्या या कार्याला स्वामीमय शुभेच्छा..!, अश्या शब्दात ना.केसरकर यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी मंडळाच्या वतीने सुरू असलेल्या नूतन महाप्रसाद गृहाच्या बांधकाम स्थळी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी स्वीय सहाय्यक अनिल भोसले व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, सौरभ मोरे,
सिद्धाराम कल्याणी, श्रीकांत झिपरे एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, बाळासाहेब घाडगे, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, अतिश पवार, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले, सागर याळवार, योगेश कटारे, रोहन शिर्के, जगन्नाथ ढगे, सुमित कल्याणी, विराज माणिकशेट्टी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
श्री क्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर :
सध्या महाप्रसादगृह इमारतीच्या बांधकामाचे काम सुरु झाले आहे. ही भव्य इमारत ५ मजली असून त्यावर ५१ फुटी श्री स्वामींची मूर्ती असणार आहे. ही इमारत वातानुकुलीत असून, या इमारतीत एकावेळेस २००० भाविक महाप्रसाद घेतील व ५००० भाविक प्रतीक्षेत असतील इतक्या क्षमतेची आहे. ही इमारत श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर टाकणारी आहे. गरज ओळखून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांनी नूतन महाप्रसाद गृह उभारणीचा निर्णय म्हणजे दूरदृष्ठी असल्यानेच न्यासाची प्रगती पथावर दिसत आहे. त्यांच्या या कार्याला स्वामीमय शुभेच्छा..!