आ. निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती
कुडाळ : घावनळे गावचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिनेश वारंग यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक ३० मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आ. निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
🔰 उपक्रम 🔰
◾ यावर्षी १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या गावातील ६० विद्यार्थ्यांचा सत्कार
◾ घावनळे गावातील सर्व ५६ महिला बचत गट व शेतकरी गट यांना ताडपत्री वाटप
◾ गावातील शेतकऱ्यांना सुपारी रोप वाटप
📌 टीप : वाढदिवस कार्यक्रम व स्नेहभोजन कार्यक्रम ग्रामपंचायत घावनळे हॉलमध्ये होईल

Subscribe








