कुडाळ तालुक्यातील वर्दे गावासाठी मिळणार नूतन तलाठी कार्यालय इमारत

15 लक्ष निधी मंजुरीचे आदेश प्राप्त झाल्याने वर्दे ग्रामस्थांनी मानले आमदार निलेश राणेंचे आभार

कुडाळ मालवण मतदारसंघात येणाऱ्या कुडाळ तालुक्यातील वरदे गावासाठी आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे नूतन तलाठी कार्यालय इमारत मंजूर झाली असून 15 लक्ष निधी प्रशासकीय मंजुरीचे आदेश प्राप्त होताच वर्धे ग्रामस्थांनी कुडाळ मालवणचे कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत. वर्दे ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी आमदार महोदयांकडून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून पूर्ण झाल्याने ग्रामस्थांकडून आमदारांच्या कामगिरीचे समाधान व्यक्त होत आहे.आमदार निलेशजी राणे यांच्या हस्ते नूतन तलाठी कार्यालयाच्या इमारतीचा भव्य दिव्य भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे वर्दे ग्रामस्थ तथा शिवसेना पदाधिकारी तुषार सावंत यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!