कुडाळ : रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळ समूहाची राज्यव्यापी सरपंच परिषद कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या सरपंच परिषदेसाठी कोकण विभागातून निरुखे सरपंच कीर्तिकुमार तेरसे यांची निवड करण्यात आली आहे.
निरुखे गावच्या सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर त्यांची विकासाची घौडदौड सुरूच आहे. त्यांच्या कार्यकाळात गावामध्ये १ पूल, ४ कॉजवे, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, खुली व्यायामशाळा, ५४ घरकुले, सार्वजनिक शौचालय, ‘क’ वर्ग पर्यटन अशी अनेक विकासकामे झाली आहेत. तसेच गावाला आर.आर. आबा सुंदरगाव पुरस्कार, आदिशक्ती पुरस्कार, टी. बी. मुक्त गाव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना अनेकदा आदर्श सरपंच पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
कीर्तिकुमार तेरसे यांच्या रुपात निरुखे गावाला एक उच्चशिक्षित व अभ्यासू सरपंच लाभला आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली निरुखे गावच्या विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावत आहे. ‘कीर्तिकुमार’ यांनी आपल्या नावाप्रमाणेच एक ‘कीर्तिवंत’ अशी कामगिरी केली आहे. त्यांच्या भावी वाटचालीस सिंधुदर्पण न्यूज चॅनेलकडून मनःपूर्वक शुभेच्छा!

Subscribe









