सिंधुदुर्ग : जिल्हा पोलीस दलाचे वतीने नागरीकांचा ग्रामीण दुर्गम भागात पोलीस दलाशी थेट संवाद व्हावा त्याचप्रमाणे गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना, सायबर गुन्हे, अंमली पदार्थ विषयक डायल 112 हेल्पलाईन, जनजागृती विशेषतः जेष्ठ नागरीक, महिला व बालके यांची सुरक्षा नागरीकांच्या तक्रारीचे त्वरीत निरसण करण्यासाठी दि. 09.01.2025 ते दि. 23.01.2025 रोजीचे मुदतीत ग्रामसंवाद उपक्रम मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांचे संकल्पनेतुन राबविण्यात येत आहेत.
सदर उपक्रमाअंतर्गत दिनांक 13.01.2025 रोजी भोगवे, निवती ता. वेंगुर्ला येथे सायंकाळी 17.00 वा. चे मुदतीत ग्रामसंवाद कार्यक्रम पार पडला. सदरवेळी गावाच्या वतीने मा. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांचे पारंपारीक पध्दतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी ग्रामस्थांशी संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यामध्ये पोलीस विभागाव्यतीरीक्त इतर विभागांच्या अडी-अडचणी उपस्थित ग्रामस्थ व महिलांकडून जाणुन घेवुन त्यासंबंधाने संबधीत विभागास पत्रव्यवहार करुन सोडविणेकामी मा. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी आश्वासित केले. तसेच देशाच्या सुरक्षीततेच्या दृष्टिने समुद्रकिनाऱ्यांचे महत्व, अवैध समुद्रमार्गे होणारी तस्करी याबाबत दक्षता घेणेबाबत सुचना देण्यात आल्या. तसेच हॉटेल, होम स्टे मध्ये पर्यटकांचे रजिस्टरमध्ये सर्व तपशिलवार माहिती ओळखपत्रासह घेणे, वॉटर स्पोर्टसवरील कामगांराची चारीत्र्य पडताळणी करणे इ. बाबत मार्गदर्शन केले. दरम्यान जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी सायबर जनजागृती पथनाट्य उत्कृष्ठरित्या सादरीकरण केले.
नमुद उपक्रमास भोगवे गावचे संरपंच, उपसंरपंच, माजी संरपंच, तंटामुक्त अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठीत नागरीक, जेष्ठ नागरीक, पोलीस पाटील, ग्रामपंचायत विभागातील कर्मचारी, महिला, शिक्षक व मुले सहभागी सहभागी झालेले होते.
सदर उपक्रमामध्ये जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावरील अन्य प्रशासकिय विभागाचे अधिकारी यांनी तसेच पत्रकार, स्वयंसेवी संस्था, नागरीक, विद्यार्थी, शिक्षक, गावातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी इ. उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन सिंधुदुर्ग पोलीस दलाचे वतीने करण्यात येत आहे.