खा.नारायण राणे यांच्या पाठपुराव्याला यश
ब्युरो न्यूज: पर्यटकांचे आकर्षण असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हाच्या पर्यटन विकासास आता चालना मिळणार आहे.कारण राज्यांना विशेष अनुदान देण्याच्या योजने अतंर्गत सिंधुदुर्गातील गुलदार अंडर वॉटर म्युझियम आणि पाणबुडी पर्यटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील आणि खा.नारायण राणे यांच्या पाठपुराव्यामुळे सरकारने 46.91 कोटी रुपये मंजूर केले आहेत.याबाबतची घोषणा खा.नारायण राणे यांनी आपल्या एक्स हॅण्डल वरून केली आहे.