Category बातम्या

१७४३ आंबा-काजू बागायतदारांच्या खात्यावर ३ कोटी ९४ लाखांची नुकसान भरपाई जमा

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू पिकांच्या नुकसानीपोटी नुकसान भरपाई वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू असून, दि. २८ सप्टेंबर २०२६ अखेर आणखी १ हजार ७४३ आंबा-काजू बागायतदारांच्या बँक खात्यावर ३ कोटी ९४ लाख ८ हजार २५१ रुपये नुकसान भरपाई जमा…

खासदार नारायण राणे यांचा सिंधुदुर्गातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार

पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांच्यासोबत खासदार नारायण राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची झाली बैठक असलेल्या पाण्याचे नियोजन, पाणी अडविणे, पाण्याचे संगोपन तसेच पाणी जमिनीत जिरविण्यासाठी केल्या जाणार उपाय योजना सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना…

पाणी अडवा… पाणी जिरवा संकल्पनेतून जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या पुढाकारातून अणाव येथे साकारला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या वर्षीचा पहिला कच्चा बंधारा

रोटरी क्लब ऑफ कुडाळ, संविता आश्रम पणदूर आणि आकार फाउंडेशन कुडाळ यांचा संयुक्त उपक्रम जिल्ह्यात १० हजारांपेक्षा जास्त बंधारे बांधणार – दादा साईल पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी अशा प्रकारचे बंधारे बांधणे आवश्यक – रो. मकरंद नाईक कुडाळ : रोटरी क्लब…

मांडकुली, कुंभारवाडा येथून महिला बेपत्ता

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील मांडकुली, कुंभारवाडा येथून 72 वर्षीय महिला सोमवार 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून बेपत्ता आहे. या महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास तत्काळ कुडाळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी श्रीमती स्मिता…

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबईचे आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात शासनमान्य मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबईचे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शासनमान्य मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन, पुराभिलेख संचालनालय मुंबई आणि आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२५ नोव्हेंबर ते…

कुडाळमध्ये दुचाकी गॅरेजला अचानक आग

सुमारे एक लाखांचे नुकसान कुडाळ : कुडाळ शहरातील कृष्णाई सुपर मार्केटसमोरील सुलभ शौचालयालगत असलेल्या दुचाकी दुरुस्तीच्या गॅरेजला सोमवारी सायंकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता ही घटना निदर्शनास आली. आगीची माहिती मिळताच कुडाळ नगरपंचायतीचा अग्निशमन बंब घटनास्थळी…

१३ वर्षीय मुलीवरील अत्याचारप्रकरणी ६१ वर्षीय संशयिताला अटक

सावंतवाडी : बांदा पंचक्रोशीतील एका गावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून ६१ वर्षीय किराणा दुकानदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जयदेव विठ्ठल म्हाडगुत असे संशयिताचे नाव आहे. मे महिन्यानंतर दोन वेगवेगळ्या प्रसंगी हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.…

प्राजक्त चव्हाण यांना विधी शाखेची पदवी

कुडाळ – क. म. शि. प्र. मंडळाचे इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल कुडाळ चे सहाय्यक शिक्षक यांना मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेची (L.L.B) पदवी प्राप्त झाली.कुडाळ येथील व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज मधून मुंबई विद्यापीठची पदवी प्राप्त केल्याबद्दल क. म. शि. प्र. मंडळाच्या…

सुप्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते सुशांत शेलार यांचे युवासेनेच्या वतीने स्वागत

कुडाळ : सुप्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते आणि शिवसेना सचिव श्री सुशांत शेलार यांचे आज कुडाळ मधे खाजगी दौऱ्यानिमित्त्त आले असताना युवासेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख स्वरूप वाळके व तालुकाप्रमुख सागर वालावलकर,कुमार राठोड,विजय जाधव,समीर परब उपस्थित होते.

फोंडाघाटमध्ये लोखंडी रॉडने बेदम मारहाण;

उपचारादरम्यान 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू कणकवली : फोंडेकरवाडी येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सूर्यकांत विठ्ठल फोंडेकर (वय 52) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी विष्णू यशवंत तळेकर…

error: Content is protected !!