मांडकुली, कुंभारवाडा येथून महिला बेपत्ता

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील मांडकुली, कुंभारवाडा येथून 72 वर्षीय महिला सोमवार 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून बेपत्ता आहे. या महिलेबाबत काही माहिती मिळाल्यास तत्काळ कुडाळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी श्रीमती स्मिता आत्माराम कुडतरकर, वय 72 वर्षे, रा. मांडकुली, कुंभारवाडा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, या दिनांक 28 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडल्या असून, अद्यापपर्यंत घरी परतलेल्या नाहीत.

घरातून बाहेर पडताना अंगावरील वर्णन

सोनेरी-चॉकलेटी रंगाची साडी
लाल रंगाचा ब्लाऊज
निळ्या रंगाच्या स्लीपर
दोन्ही हातात पिवळसर रंगाच्या दोन बांगड्या
कानात कुडी असून, त्याला मागील बाजूस पट्टी आहे.
सदर महिला आपल्या परिसरात किंवा हद्दीत आढळून आल्यास, कृपया त्यांना सुरक्षित ठिकाणी थांबवून ठेवावे व तात्काळ कुडाळ पोलीस ठाणे किंवा त्यांच्या नातेवाईकांना कळवावे.

तसेच सदर महिलेबाबत कोणास काही उपयुक्त माहिती मिळाल्यास तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कुडाळ पोलिसांनी केले आहे.

कुडाळ पोलीस ठाणे 02362-222533

प्रशांत कुडतरकर (मुलगा):
📱 9404940064
📱 9284197215

error: Content is protected !!