ब्युरो न्यूज: शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर अनेक वर्षे वारस नोंदणी न झालेल्या सातबारांमध्ये आता महसूल वारसदारांच्या नोंदी करणार आहे. याद्वारे मृत सातबारा ‘जिवंत’ करण्यात येणार आहे.शेतकरी मरण पावल्यानंतर त्यांच्या वारसदारांमध्ये शेती आणि मालमत्तेच्या वाटणीवरून वाद निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. वारसदारांची संख्या अधिक असल्यास सामोपचाराने वाटप होऊ शकले नाही. या एकमेव कारणामुळे राज्यातील शेकडो एकर शेतजमीन मृत शेतकऱ्यांच्या नावावर वारसदारांची संख्या वर्षानुवर्षे वाढत गेल्यामुळे वारस नोंदणी प्रक्रियेत मोठ्या अडचणी येत आहेत, तर दीर्घ प्रक्रियेमुळे अनेक प्रकरणे रखडलेली आहेत. याचा फटका शेतकऱ्यांचे वारसदार आणि शासकीय उद्देशाला बसत आहे. सातबारा अपडेट नसल्यामुळे शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान पीककर्ज योजना, पीक विमा, आणि विविध कृषी योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. मृत शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असल्यामुळे शासकीय योजनांचा लाभ विद्यमान वारसदारांना मिळत नाही. राज्यातील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसदारांच्या नावावर नियमानुसार जमिनींची नोंदणी करणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर अनेक वर्षे वारस नोंदणी न झालेल्या सातबारांबाबत सरकारचा मोठा निर्णय
1
/
111
Sindhudurg | “भातशेतीची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे थेट शेतात” | Nitesh Rane
Sindhudurg | सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी सर्व ताकद पणाला | Nitesh Rane
मुंबई सोडणार का ग्रामस्थ? बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यात चर्चा | mumbai | Ganesh visarjan
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
1
/
111

Subscribe









