कुडाळ : कुडाळ तालुक्यातील बाव गावामधील सिद्धेश्वर मंदिराच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त बुधवार दिनांक १४ मे व गुरुवार दिनांक १५ मे रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवारी १४ मे रोजी श्रींची सर्वांग पूजा व लघु रुद्र आरंभ, आरोग्य शिबिर, हरिपाठ जीवनविद्या मिशन बाव, एकांकिका – सादरकर्ते श्री सिद्धेश्वर नाट्य मंडळ बाव, महिलांसाठी खेळ पैठणीचा हे कार्यक्रम संपन्न आले.
तर गुरुवार दिनांक १५ मे रोजी सकाळी ८.३० ते ११.०० वाजता लघुरुद्र आरंभ सांगता व सर्व देवतांना अभिषेक व ओम नमः शिवाय जप, सकाळी ११.०० ते १२.०० वाजता ढोल ताशांच्या गजरात दिंडी प्रदक्षिणा, १२.०० वाजता महानैवैद्य व महाआरती व तीर्थप्रसाद, १.३० वाजता महाप्रसाद, सायं ७.३० वाजता, रात्रौ.९.०० वाजता श्री खानोलकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ खानोली यांचा दणदणीत नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
तेव्हा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.