कणकवली प्रतिनिधी: कसवण, बौद्धवाडी येथील एका विवाहित महिलेने घराच्या पाठीमागे असलेल्या शौचालयात स्वतःला जाळून घेण्याची घटना घडली आहे. गंभीर भाजल्याने त्यातच तिचा मृत्यू झाला असून वेडाच्या भरात तिने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृणाली मनोहर नादावडेकर (४२) असे त्या महिलेचे नाव असून ही घटना सोमवारी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.या घटनेबाबत मनोहर नादावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची पत्नी मृणाली ही काहीही कारण नसताना सुमारे दीड वर्षापासून वेड्यासारखी वागत होती. तसेच ऑगस्ट २०२३ मध्ये मृणाली वेडाच्या लहरीत घरातून निघून गेली होती. तेव्हा तिची शोधाशोध केली असता ती कुडाळ रेल्वेस्थानकाबाहेर सापडली होती. मनोहर यांनी मृणाली हिला रत्नागिरी येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ती त्यांना ऐकत नव्हती. ३० नोव्हेंबर रोजी मृणाली ही अचानक बेशुद्ध झाल्याने तिला ओरोस जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले होते. तिथे प्राथमिक उपचार करून गोवा, बांबोळी येथे हलवण्यात आले होते. तेथून ७ डिसेंबर रोजी कसवण येथील घरी आली होती.सोमवारी मनोहर हे कणकवली येथे कामानिमित्त आले असताना त्यांच्या मुलीचा फोन आला. तिने आईने आग लावून घेतली असल्याचे सांगितले. त्यानंतर मनोहर हे घरी गेले असता मृणाली जळालेल्या स्थितीत मिळून आली. तिला १०८ रुग्णवाहिका बोलावून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिचा त्याआधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
कसवण येथील विवाहित महिलेचा जळाल्याने मृत्यू
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111

Subscribe










