८० टक्के बेड रिकामी मात्र रुग्णालयातील कपडे धुण्याचे तब्बल ५६ लाख रु. झाले बिल
वैभव नाईक, राजन तेली, संदेश पारकर, सतीश सावंत यांनी त्रुटी, समस्यांचा वाचला पाढा
सहसंचालकांकडे समस्या सोडविण्याची केली मागणी
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा घेण्यासाठी सिंधुदुर्गात आलेल्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सहसंचालक डॉ. पल्लवी सापळे यांची आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने ओरोस येथे भेट घेऊन त्यांच्यासमोर वैद्यकीय महाविद्यालयातील भ्रष्टाचाराची पोलखोल केली. तसेच त्रुटी व समस्यांचे निवेदन देण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने २३० कमर्चारी भरण्यात आले आहेत मात्र त्यातील १०० कमर्चारी प्रत्यक्षात कामावर उपस्थित असतात इतर कमर्चाऱ्यांच्या खोट्या सह्या मारून त्यांच्या पगाराचे पैसे काढून भ्रष्टाचार केला जात आहे. दरदिवशी १०० पेक्षा कमी ओपीडी रुग्ण संख्या असताना आणि रुग्णालयात ८० टक्के बेड रिकामी असताना रुग्णालयातील कपडे धुलाई करण्याचे तब्बल ५६ लाख रु. बिल देण्यात आले आहे. त्यामुळे हे महाविद्यालय भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. असा आरोप शिवसेना शिष्टमंडळाने केला.
महाविद्यालयात केवळ ४ अध्यापक कार्यरत असून त्यातीलच अनंत दवंगे यांना अनुभव नसताना देखील अधिष्ठाता पदावर बसविण्यात आले आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य देखील अंधारात आहे. याकडे सहसंचालक यांचे लक्ष वेधण्यात आले व लवकरात लवकर महाविद्यालयाची दयनीय झालेली परिस्थिती सुधारावी अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी केली. त्रुटी व समस्यांचा बैठकीत आढावा घेऊन येत्या १५ दिवसात जनरल आयसीयु सुविधा रुग्णालयात उपलब्ध करण्याची ग्वाही यावेळी सहसंचालक डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत दवंगे, शिवसेना ओरोस विभागप्रमुख नागेश ओरोसकर, अवधूत मालणकर, भगवान परब व रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गेल्या वर्षभरात वारंवार आंदोलने,धडक मोर्चे काढूनही वैद्यकीय महाविद्यालयातील त्रुटी व समस्या मार्गी लावल्या जात नाहीत. अधिष्ठाता डॉ. अनंत दवंगे यांच्याकडून समर्पक उत्तरे दिली जात नाहीत अथवा ठोस कार्यवाही देखील केली जात नाही. अशी तक्रार शिवसेना शिष्टमंडळाने सहसंचालक यांच्याकडे केली. येथे रुग्णच येत नसतील तर कपडे कोणाचे धुतले जातात असा सवाल उपस्थित केला. रुग्णालयात आयसीयु चा एकही बेड उपलब्ध नाही,गेली ५ वर्षे सी आर्म मशीन बंदावस्थेत आहे. अध्यापक, वैद्यकीय अधिकारी, प्रशाकीय अधिकारी,तांत्रिक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. मात्र २३० कंत्राटी पदे भरण्यात आली आहेत.साधन सामग्री उपलब्ध नाही. रुग्ण व गरोदर मातांना सकस आहार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. बहुतांश रुग्ण गोवा बांबूळी आणि खाजगी रुग्णालयात पाठवले जातात.साफसफाईचे स्वतंत्र कर्मचारी असूनही परिचर कर्मचाऱ्यांकडून साफसफाईसाठी करून घेतली जाते. प्रत्यक्षात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य पगार दिला जात नाही अशा अनेक समस्यांचा पाढाच सहसंचालक यांच्यासमोर मांडण्यात आला. त्यासंदर्भाचे निवेदन देण्यात आले. या त्रुटी व समस्यांचा आढावा घेऊन लवकरात लवकर समस्या सोडविण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी अशी मागणी शिवसेना शिष्टमंडळाने सहसंचालकांकडे केली. तसेच कंत्राटी कर्मचारी प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी उपस्थित नसताना त्यामुळे त्यांची हजेरी बायोमेट्रिक प्रणालीद्वारे घेण्यात यावी असे सांगितले.
सफाई कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे वेतन देण्यात आले नाही अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी केल्याने शिवसेना शिष्टमंडळाने स्मार्ट इंडिया कंपनीच्या सुपरवायझरला धारेवर धरून कंपनीच्या मॅनेजरशी फोनवर चर्चा केली. व सफाई कर्मचाऱ्यांना तात्काळ पगार देण्याच्या सूचना करण्यात आल्या. अन्यथा पुण्यातील कार्यालयात धडक देऊ असा इशारा दिला.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe










