रातोरात पक्ष बदलण्यात माहीर असलेल्या काका कुडाळकरांनी निष्ठावंत वैभव नाईकांना नीतिमत्ता शिकवू नये.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्ते बाळा पावसकर यांची टीका

कुडाळ : सरड्याने रंग बदलावे तसे काका कुडाळकर पक्ष बदलतात. एका रात्रीत दोन पक्ष बदलण्यात जिल्ह्यात काका कुडाळकर यांचा दुसरा क्रमांक लागतो, हे जगजाहीर आहे. आपल्या जिल्हा परिषद अध्यक्ष काळात स्वतःच्या कुडाळ शहरासाठी साधी पाणंद सुद्धा बनवू शकले नाहीत, ते काका कुडाळकर दोन टर्म आमदार राहिलेल्या वैभव नाईक साहेब यांच्यावर विकासाच्या गोष्टीवरून टीका करतात हे हास्यास्पद आहे. अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्ते बाळा पावसकर यांनी केली आहे.

काका कुडाळकर यांनी पहिल्यांदा आपलं इतिहास पहावा, सिंधुदुर्गात शिवसेना व नारायण राणे यांची चलती होती. त्यावेळी, शिवसेनेने ज्याच्या कपाळावर सिंदूर लावला आणि उमेदवारी दिली तो सिंधुदुर्गात निवडून येत होता. अशावेळी, काका कुडाळकर यांना दोन वेळा घावनळे जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवारी देऊन सुद्धा निवडून येऊ शकले नाहीत. त्यानंतर काँग्रेसमध्ये गेल्यावर काँग्रेसने विधानसभेची उमेदवारी दिली. परंतू, प्रत्येक वेळी नारायण राणेंनी दिलेले निवडणुकीचे पैसे कटाप मांरण्याची सवय असलेले काका कुडाळकर यांना काँग्रेसने निवडणूक फंड देणार नाही हे कळल्यावर समोरच्या उमेदवाराकडून पैसे घेऊन आपले अधिकृत एबी फॉर्म सहित दिलेली उमेदवारी नाकारली.

सलग दोन टर्म आमदार होणे ही साधी गोष्ट नाही, तीही माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करून! पैशाच्या आणि ईव्हीएमच्या जोरावर निवडून आलेल्या निलेश राणेंची तळी उचलून माजी आमदार वैभव नाईक साहेबांवर बोलू नये. निलेश राणेंच्याच वडिलांनी तुम्हाला तेर्से बांबार्डे येथे गाडीतून उतरवून घातले होते याचा विसर तुम्हाला पडला असेल परंतू, आमच्या अजून लक्षात आहे बरं का! स्वतः जिल्हा परिषदेला पराभूत झालात, नगरपंचायत निवडणुकीत स्वतःच्या घरच्या उमेदवाराला निवडून आणू शकला नाहीत. पुढच्या टर्म ला शिवसेनेने युती करून तुम्हाला उमेदवारी दिली होती व कुडाळ शहरात तिरंगी लढत असताना काँग्रेसने पाठिंबा देऊन एकास एक लढत करण्याचा प्रयत्न केला. परंतू, स्वतः नगरपंचायतीच्या एका वॉर्डच्या निवडणुकीत पराभूत झालात. यावरूनच तुमची पात्रता काय आहे हे जनतेने दाखवून दिलं हे कुडाळकरांनी लक्षात ठेवावं. बिनकामाचा फक्त पोपटपंची करणारा स्वयंघोषित नेता म्हणून आपली शहरात ओळख आहे.

मुळात, माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर काका कुडाळकर हे टीका करण्यामागचे मुख्य कारण कुडाळ तालुक्यातील ठेकेदारी काम मिळवून ती कामे विकून आर्थिक मलिदा लाटण्यासाठीच आणि आमदार निलेश राणे यांचा डोक्यावर हात रहावा हाच मुख्य उद्देश आहे.

त्यामुळे, यापुढे मा.आम.वैभवजी नाईक साहेबांवर टीका कराल तर याद राखा, जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते बाळा पावसकर यांनी दिला आहे.
error: Content is protected !!