ग्रामपंचायत व आयुष्यमान आरोग्य मंदिराचा संयुक्त पुढाकार सरपंचांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
केतन शिरोडकर /पिंगुळी.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘आपलं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत पिंगुळी येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. ग्रामस्थांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण व्हावी आणि गाव आरोग्याच्या दृष्टीने सक्षम व्हावे, या उद्देशाने ग्रामपंचायत पिंगुळी व आयुष्यमान आरोग्य मंदिर पिंगुळी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये ग्रामपंचायत सरपंच अजय आकेरकर, उपसरपंच मंगेश मसके, ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण, केशव पिंगुळकर, आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीम. सोनाली गारे, जनआरोग्य कृती समितीचे सदस्य राजन पांचाळ यांच्यासह आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, सीआरपी, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.