पिंगुळीच्या पाझर तलावासाठी ग्रामस्थांचा एल्गार.

कुडाळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू.

महिला, ज्येष्ठ नागरिकांसह शेकडो ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय नेते आंदोलनात सहभागी

केतन शिरोडकर /कुडाळ

पिंगुळी गावाच्या ऐतिहासिक पाझर तलावाच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी अखेर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तलावाचे संरक्षण करावे, तसेच तलाव बुजवून रस्ता बंद केल्याच्या कथित प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी कुडाळ तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनाला पिंगुळी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून महिला, ज्येष्ठ नागरिक, युवकांसह शेकडो ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय राजकीय नेते एकाच व्यासपीठावर एकवटले आहेत.

पिंगुळी गावासाठी महत्त्वाचा असलेल्या या पाझर तलावाच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परप्रांतीय बिल्डरकडून तलाव बुजवून जाण्याचा रस्ता बंद करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे तलावाचे नैसर्गिक अस्तित्व धोक्यात आले असून, भविष्यात गावाच्या पाणीप्रश्नावरही परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांनी आता बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

या आंदोलनाला राजकीय पक्षांच्या भिंती बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दर्शविला. जिल्हा परिषद सदस्य गुरुनाथ सडवेलकर, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब,प्रदीप माने,कुणाल किनळेकर, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, विजय प्रभू, नगरसेवक मंदार शिरसाट, संजय वेतुरेकर पंचायत समिती सदस्स ममता राऊळ,ग्रामपंचायत सदस्य आयाज खुल्ली, अन्वी बांदेकर, सागर रनसिंग, अंकिता जाधव, गंगावणे मॅडम, तुलसीदास पिंगुळकर,भरत परब,तंटामुक्ती अध्यक्ष अण्णा रनसिंग, माझी सरपंच निर्मला पालकर, राजा पांचाळ, रामदास करंगुटकर, चेतन राऊळ, ओंकार राऊळ, हेमंत पिंगुळकर, भूषण तेजम, दत्तगुरु राऊळ, मिलिंद परब ,दीपक गावडे बाबल गावडे ,,सतीश धुरी, संकेत धुरी, साधना माडये , दत्ता पाटील,हेमंत देशपांडे, अनंत धुरी, गणेश भगत, समीर धुरी, चेतन पेंडणेकर, अजय बांदेकर, समीर मयेकर, बाबल तेजम, सुरज वाक्कर, रोहन परब,निलेश प्रभु आदींसह
विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले.

पिंगुळीच्या पाझर तलावाचे संरक्षण होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी एकमुखी मागणी आंदोलनस्थळी करण्यात येत आहे.

error: Content is protected !!