भरधाव डंपरची पादचाऱ्याला धडक

चाकाखाली चिरडून ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावरील तळेरे येथे अपघात

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील तळेरे येथील सर्व्हिस रस्त्यावर डंपरच्या मागील चाकाखाली चिरडून ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रोहिदास हरिश्चंद्र देसाई (वय ६०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे तळेरे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तळेरे येथील सर्व्हिस रस्त्यावरून डंपर जात असताना रोहिदास देसाई हे अचानक डंपरच्या मागील चाकाखाली आले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, ते नेमके कोणत्या परिस्थितीत डंपरच्या चाकाखाली आले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. अपघाताचे नेमके कारण आणि घटनेचे स्वरूप याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

error: Content is protected !!