विद्यार्थ्यांनी रंगविला कल्पकतेचा रंगोत्सव; विविध गटांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण.
केतन शिरोडकर /कुडाळ
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ व कुडाळेश्वर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री देव कुडाळेश्वर मंदिरात चित्रकला व सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा तसेच इंग्लिश मीडियम शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले.
या स्पर्धेचे उद्घाटन सौ. मुग्धा कुडाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. चित्रकला स्पर्धा पहिली ते दुसरी, तिसरी ते चौथी आणि पाचवी ते सातवी अशा तीन गटांत घेण्यात आली. तर सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आठवी ते दहावी या गटासाठी आयोजित करण्यात आली होती.
श्री देव कुडाळेश्वर मंदिराच्या परिसरात विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून विविध विषयांवरील चित्रे साकारत रंगांची सुंदर उधळण केली. चिमुकल्यांपासून ते माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनीच उत्साहाने सहभाग घेतल्याने स्पर्धेचे वातावरण आनंदमय झाले होते. सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी अक्षरांचे सौंदर्य आणि लेखनकौशल्याचे उत्तम प्रदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील सर्जनशीलता आणि कलात्मकतेला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने मंडळाच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळत असल्याने पालक व विद्यार्थ्यांनी मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक करून आभार व्यक्त केले.
यावेळी मंडळाचे कार्यकर्ते उमा कुडाळकर, केदार राऊळ, सुशांत राऊळ, सत्यवान राऊळ, स्मिता राऊळ, मिलन राऊळ, गौतमी राऊळ, हर्षदा कुडाळकर, वैष्णवी राऊळ, मीरा परब, अस्मिता कुडाळकर, संजीवनी राऊळ, सारिका कुडाळकर, शिल्पा घुर्य, अश्विनी परब, गोपाळ राऊळ आदी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ. नुतन पिंगुळकर, श्री. चिऊलकर सर व सिद्धेश मेस्त्री यांनी काम पाहिले.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे :
चित्रकला स्पर्धा
गट क्रमांक १ (पहिली ते दुसरी)
प्रथम – रचित सातोसे
द्वितीय – ऋषिका वर्दम
तृतीय – युगा मसुरकर
उत्तेजनार्थ – ईरा तेरसे
गट क्रमांक २ (तिसरी ते चौथी)
प्रथम – तपस्या जाधव
द्वितीय – आदर्श पेडणेकर
तृतीय – हर्षा रवी
उत्तेजनार्थ – स्वयंम धवळे
गट क्रमांक ३ (पाचवी ते सातवी)
प्रथम – खुशी प्रजापती
द्वितीय – प्रेम परब
तृतीय – ऋग्वेदी राहुल नाडकर्णी
उत्तेजनार्थ – पवन थवी
सुंदर हस्ताक्षर स्पर्धा (आठवी ते दहावी)
प्रथम – सोनाली हुंदरे
द्वितीय – दुर्वा सतीश मडकईकर
तृतीय – कविता संदीप माळकर
उत्तेजनार्थ – इशिका संतोष सावंत
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि सर्जनशीलतेला सुंदर व्यासपीठ मिळाले.


Subscribe








