सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी 1 ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत हयातीचे दाखले सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी अरुणा हसबे यांनी केले आहे. निर्धारित मुदतीत हयातीचे दाखले सादर न केल्यास संबंधितांचे निवृत्तीवेतन डिसेंबर 2026 पासून संगणक प्रणालीद्वारे आपोआप स्थगित करण्यात येणार आहे.
शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हयातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत संबंधित निवृत्तीवेतनधारकांच्या याद्या त्यांच्या निवृत्तीवेतन जमा होणाऱ्या बँकांकडे पाठविण्यात आल्या आहेत. या मोहिमेअंतर्गत निवृत्तीवेतनधारकांनी संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन यादीतील आपल्या नावासमोर स्वाक्षरी करून हयातीच्या दाखल्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसलेल्या निवृत्तीवेतनधारकांसाठी ऑनलाइन पद्धतीने हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी जीवन प्रमाण (https://jeevanpramaan.gov.in) या संकेतस्थळाचा वापर करता येईल. तसेच 1 नोव्हेंबर 2026 पासून ‘महा-उपलब्धी’ या मोबाईल ॲपवरही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मनीऑर्डरद्वारे निवृत्तीवेतन स्वीकारणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांना जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत हयातीचे दाखले टपालाद्वारे घरपोहोच पाठविण्यात येतील. संबंधितांनी या दाखल्यावर पोस्टमास्तर किंवा शासकीय राजपत्रित अधिकारी यांची स्वाक्षरी व शिक्का घेऊन तो जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करावा.
1 नोव्हेंबर 2026 पूर्वी सादर केलेले हयातीचे दाखले ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यामुळे सर्व निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी विहित कालावधीत हयातीचे दाखले सादर करावेत.
1
/
118
Malvan | 'स्फटिक'विरोधात वराड ग्रामस्थ एकवटले, २६ जानेवारीला उपोषण! #breakingnews
Omkar Elephant Sindhudurg | ओंकार हत्तीसमोरच ग्रामस्थ आणि वनविभागात जोरदार राडा | Sawantwadi News
Vaibhav Naik | बाळासाहेबांचा फोटो फाडणाऱ्या शायना एनसी यांच्यावर काय कारवाई करणार ?
Sindhudurg | कोकण रेल्वे ट्रॅकवर 'ओंकार'ची एन्ट्री! | Elephant #viralvideo
Kudal | कुडाळमध्ये बँक लुटीचा थरार! ३३ लाखांसह संशयित पोलिसांच्या ताब्यात #kudal
Sindhudurg | आंबोली-चौकुळ रोड वर पट्टेरी वाघाचे दर्शन....
आडेली - खुटवळवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याचा मृत्यू
Kudal | "समान काम, समान वेतन"साठी न्यायालयीन कर्मचारी आक्रमक; २२ महिन्यांपासून प्रस्ताव प्रलंबित!
kudal | समान काम समान वेतन मिळालेच पाहिजे.. न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार #kudal
विमानसेवा नियमित सुरू झाल्यावरच पालकमंत्र्यांनी त्याचा इव्हेंट करावा- मा.आ. वैभव नाईक
Nitesh Rane press | पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषद | Sindhudurg #niteshrane
vengurla | वेंगुर्ला - तुळस गावात कोल्ह्यांचा भरवस्तीत वावर #vengurla
1
/
118

Subscribe







