ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मालवण यांची कुंभारमाठ ग्रामपंचायतीस भेट

ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांची कुंभारमाठ ग्रामपंचायतीस भेट देऊन आयटीआय विषयी माहिती सांगण्यात आली. तसेच उपलब्ध कोर्सेस व त्यांची माहिती देण्यात आली. तसेच कमी कालावधीसाठी उपलब्ध असणारे कोर्स याची माहिती देण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत कामकाजाची माहिती व तेथील दाखले व सेवा सुविधा यांची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांनी घेतली. यावेळी सरपंच पूनम वाटेगावकर, पंचायत समिती सदस्य मानसी भोगावकर, उपसरपंच जीवन भोगावकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद निकम, ग्रामपंचायत सदस्य राहुल परब,अनिता गावकर,माजी सरपंच गणपत सावंत, प्र.प्राचार्य श्री ए जी खेडेकर सर,‌‌ प्राध्यापक श्री आर व्ही फोंडेकर सर, श्रीमती के डी लहारे मॅडम, श्री एस एस जोशी सर आणि डी एस मायबा सर आशासेविका प्रणिता भोगावकर,अश्विनी नेवाळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!