तेर्से बांबर्डे येथे ३३ वर्षीय युवकाची आत्महत्या

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील तेर्सेबांबर्डे गावातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील ३३ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.जयराम (संदेश) शामराव सावंत (वय ३३, रा. तेर्से बांबर्डे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, जयराम सावंत यांनी आपल्या राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलत गळफास घेतला. ही बाब उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून गावावर शोककळा पसरली आहे.दरम्यान, जयराम यांनी इतके टोकाचे पाऊल नेमके का उचलले? यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

error: Content is protected !!