भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, सावंतवाडी विधानसभा क्षेत्राच्या वतीने दीपावलीनिमित्त युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडाभावना आणि पारंपरिक संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी भव्य बॉडी बिल्डिंग स्पर्धा आणि भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या ‘फिट इंडिया’ संकल्पनेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभर राबविण्यात येणाऱ्या ‘रन फॉर युनिटी’सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून एकता, आरोग्य आणि राष्ट्रभावनेचा संदेश दिला जात आहे. याच प्रेरणेतून युवा मोर्चाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
🏆 भव्य बॉडी बिल्डिंग स्पर्धा
दिनांक : १ नोव्हेंबर २०२६, रविवार
वेळ : सायंकाळी ठीक ६.०० वाजता
स्थळ : जगन्नाथ उद्यान, मोती तलाव, सावंतवाडी
या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे गोव्याशी संबंधित तसेच दुबई येथेही कामगिरी केलेले आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर निवेद शेटकर यांची उपस्थिती असणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील युवा नेते मा. विशालजी परब साहेब यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून युवकांचे आधारस्तंभ मा. विनोददादा राऊळ साहेब तसेच सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष मा. अनिलजी निलवडेकर साहेब उपस्थित राहणार आहेत.
🔥 भव्य नरकासुर स्पर्धा
दिनांक : ७ नोव्हेंबर २०२६, शनिवार
स्थळ : मोती तलाव, अमोल आईस्क्रीमसमोरील कॉर्नर, सावंतवाडी
दीपावलीच्या पारंपरिक उत्साहाला अधिक रंगत आणण्यासाठी भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळणार असून, पारंपरिक संस्कृती आणि उत्सवाची परंपरा जपण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या दोन्ही स्पर्धांना भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभणार आहे.
युवकांनी निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा, क्रीडा क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध करावी आणि दीपावलीचा सण उत्साहात साजरा करावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांमध्ये नागरिक, क्रीडाप्रेमी आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, सावंतवाडी विधानसभा क्षेत्राच्या वतीने करण्यात येत आहे.


Subscribe








