हरकुळ खुर्द गावडेवाडी प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील ठाकूर यांचे निधन

कणकवली : हरकुळ खुर्द गावडेवाडी प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील ठाकूर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या दुःखद घटनेमुळे प्रशालेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधून शोक व्यक्त केला जात आहे.

आज सकाळच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी डॉक्टरकडे घेऊन जात होते. परंतु डॉक्टरकडे घेऊन जाण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

आपल्या प्रेमळ स्वभावामुळे “विद्यार्थ्यांचे लाडके ठाकूर गुरुजी” अशी त्यांची प्रशालेत ओळख होती. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ते विशेष मेहनत घेत असत. त्यांनी आजवर अनेक विद्यार्थी घडवले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेने जिल्हाभरात नावलौकिक मिळवला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देखील बहाल करण्यात आला होता.

आपल्या दारिस्ते गावात देखील त्यांचे सर्वांशी सलोख्याचे सबंध होते. सर्वांच्या अडीअडचणीमध्ये ते नेहमी धाऊन जात असत. तसेच मदतकार्यामध्ये देखील ते नेहमी अग्रेसर होते. त्यांच्या या अचानक जाण्याने दारिस्ते गावासह विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, बहिण असा परिवार आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

error: Content is protected !!