विक्रेत्यांकडून कुडाळ नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर आणि स्थानिक नगरसेविका नयना मांजरेकर यांचे आभार!
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या निधीतून वार्षिक ठेकेदारामार्फत कुडाळ मच्छीमार्केटमधील फ्लोरिंग दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. आज या कामाची स्थळ पाहणी करण्यात आली.
यावेळी मच्छी विक्रेत्या भगिनी, कुडाळ शहर मच्छीमार विक्रेते अध्यक्ष, स्थानिक नगरसेविका सौ. नयना मांजरेकर तसेच कुडाळ नगरपंचायतीचे अधिकारी, ठेकेदार उपस्थित होते.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीची दखल घेऊन तत्परतेने फ्लोरिंग दुरुस्तीचे काम पूर्ण केल्याबद्दल मच्छीमार विक्रेते व भगिनींनी समाधान व्यक्त करत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. जनतेच्या समस्यांची तत्परतेने दखल घेऊन त्या मार्गी लावण्याच्या नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या कार्यतत्परतेचे आणि सौ.नयना मांजरेकर यांच्या पाठपुराव्याचे मच्छीमार विक्रेते व भगिनींनी मनःपूर्वक कौतुक केले. या कामामुळे मच्छी विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला असून, नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देत स्थानिक समस्या मार्गी लावण्याच्या नगरपंचायतीच्या सकारात्मक कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त होत आहे.