ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे महोत्सवाचा श्रीगणेशा!

२६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

योगिता कानडे/केसरकर : आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पुरस्कारप्राप्त, तसेच ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ व जलसमृद्ध गाव म्हणून नावाजलेल्या ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे यांच्या वतीने ‘ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे महोत्सव २०२६’ चे २६ ते २८ ऑक्टोबर २०२६ दरम्यान भव्य आयोजन करण्यात आले आहे. जि. प. प्रा. शाळा नं. १ पटांगण, ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे नजीक हा महोत्सव पार पडणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात धार्मिक, सामाजिक, महिला व युवकांसाठी विविध स्पर्धा व मनोरंजनाचे रंगतदार कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

कार्यक्रमांची रूपरेषा:

दिनांक २६ ऑक्टोबर २०२६:
सकाळी ९.०० वा.: सत्यनारायणाची महापूजा

सकाळी ११.०० वा.: महाआरती

दुपारी १.०० ते ३.०० वा.: महाप्रसाद

दुपारी २.०० ते ७.०० वा.: भजने

दुपारी ३.०० ते ५.०० वा.: गाय, म्हैस, रेडा व बैल सजावट स्पर्धा (सामाजिक संदेश देणारी – गावमर्यादित)

सायंकाळी ७.०० वा.: रामकृष्ण हरी भजन मंडळ, गावडेवाडी प्रस्तुत ‘हरीपाठ’

रात्री ९.०० वा.: चेंंदवणकर दशावतार नाट्यमंडळ यांचा महान पौराणिक दणदणीत नाट्यप्रयोग – “व्यंकटरमणा जय गोविंदा अर्थात महिमा तिरुपती बालाजीचा” (विशेष आकर्षण: ट्रिक्सीन व हालते देखावे).

दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ – “सनमान राजमातांच्या लेकींचा…”:
दुपारी २.०० ते ३.०० वा.: महिलांसाठी हळदी-कुंकू (गावमर्यादित)

दुपारी ३.०० ते ६.०० वा.: महिलांसाठी विविध स्पर्धा

सायंकाळी ६.०० वा.: ‘स्मार्ट वहिनी’ (गावमर्यादित स्पर्धा)

प्रथम क्रमांक: वॉशिंग मशीन

द्वितीय क्रमांक: फ्रिज

विशेष सांस्कृतिक कार्यक्रम:

सुप्रसिद्ध नृत्य कलाकार समर्थ गवंडी यांचा नृत्य आविष्कार (देवी, कांतारा व दशावतार जीवनपटावर आधारित नृत्य)

मिमिक्री शो (सादरकर्ते: अरुण कुमार)

दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ – “युवाई” (जागर युवा शक्तीचा.. सागर नव्या आशेचा!) सकाळी १०.०० वा.: पहिली ते चौथी गट व पाचवी ते सातवी गट विद्यार्थ्यांसाठी ‘फणी गेम्स स्पर्धा’ (गावमर्यादित)

दुपारी ३.०० वा.: पुरुषांसाठी विविध स्पर्धा (गावमर्यादित)

रात्री ९.०० वा.: संकल्प क्रीएशन डान्स अकॅडमी प्रस्तुत ‘नृत्यरंग’ (भव्य सांस्कृतिक कार्यक्रम)

शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी व चाऱ्यासाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे व समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!