शरीरावर आढळल्या जखमा; घातपाताचा संशय
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील वझरे येथील आंगण प्रकल्पात कार्यरत सुरक्षा रक्षक मोहन वासूदेव गवस यांचा गुरुवारी (२२ ऑक्टोबर) कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, मृतदेहावर जखमा आढळल्याने घातपाताची शक्यता नातेवाईक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या घटनेनंतर गवस यांच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात धाव घेत संशय व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा आणि तपासाची प्रक्रिया सुरू केली.
दरम्यान, मोहन गवस यांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता मृतदेह दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकाराबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मृत्यूचे कारण, शरीरावरील जखमांचे स्वरूप आणि नातेवाईकांनी केलेल्या आरोपांची सत्यता याबाबत दोडामार्ग पोलीस तपास करत आहेत. तपासातून नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.


Subscribe







