शिक्षक समितीने जि.प.अध्यक्षांना निवेदन देऊन मागणी केली
कुडाळ : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गासह महाराष्ट्रातील विविध भागात सिंधुदुर्ग जिल्हयातील कार्यरत शिक्षकांना गावी जाता यावे यासाठी व पोषण आहार स्वयंपाकी मानधन तात्काळ जमा करावे या मागणीचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत यांची भेट घेऊन निवेदन व चर्चाकरून मागणी करण्यात आली.
यावेळी राज्य महासचिव श्री राजन कोरगांवकर, जिल्हाध्यक्ष श्री विठ्ठल गवस, राज्य कार्यकारिणी सदस्य श्री सचिन मदने, तालुकाध्यक्ष श्री शशांक आटक, शिक्षकनेते श्री प्रसाद वारंग, तालुका सचिव श्री महेश गावडे ,दोडामार्ग अध्यक्ष महेश काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महा राज्य प्राथ शिक्षक समिती शाखा कुडाळ च्या वतीने थेट जिप अध्यक्ष तसेच CEO आणि शिक्षणाधिकारी यांना थेट निवेदने सादर केली .
दिपावली सुट्टी जरी ९ नोव्हेंबर पासून सुरु होत असली तरी जिल्ह्यातील आंतरजिल्हा शिक्षक बंधु – भगिणींना प्रत्यक्ष दिपावली सणआपल्या घरी आपल्या परिवारा सोबत साजरा करता यावा यासाठी शनिवार दि ७ नोव्हेबर ला प्रशासनाने सुट्टी जाहीर करावी अशी मागणी शिक्षक समिती कुडाळ शाखेने लोखी स्वरूपात केली .
मान जिल्हा परिषद अध्यक्ष श्री कामत साहेब यांनी मान . शिक्षणाधिकारी श्री सुबोध माने व आंगणे साहेब यांना दालनात बोलावून चर्चा करून संघटनेच्या मागणी नुसार शिक्षकांना ७ नोव्हेंबर रोजी एक दिवसाची सुट्टी मंजुर करावी असे आदेश दिले .
श्री अजित ठाकूर ( सावंतवाडी ) यांच्या अधिसंख्य पदा संदर्भात दोन दिवसात टिपणी सादर करून त्यांना नियमित शिक्षक म्हणून आदेश द्यावेत .
जिल्ह्यातील अनुसूचित जमातीतील मुलांसाठी शासनामार्फत दिली जाणारी सुवर्ण महोत्सवी स्कॉलरशीप साठी शिक्षणाधिकाऱ्यांनी तातकाळ सर्व तालुक्यांना प्रस्ताव करण्या संदर्भात लेखी पत्र काढून अवगत करावे .
स्पर्ष प्रणाली चा अडसर दूर करून येत्या आठ दिवसात स्वयंपाकी व मदतनिस यांचे मानधन विनाविलंब जमा करणार असे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगीतले .
चट्टोपाद्याय चे जिल्ह्यातील १२ प्रस्ताव तानकाळ निकाली काढुन संबंधीताना लाभ देण्यात यावेत .
असे तातडीच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली प्रशासकिय अधिकारी व पदाधीकारी यांनी सकारात्मकता दर्शविली .


Subscribe







