मंगळागौर, नृत्याविष्कारांनी नवरात्रोत्सवाचा सातवा दिवस रंगला!

संतोष वालावलकर कुटुंबीय पुरस्कृत ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सी व सिद्धिविनायक कॉलनीत सांस्कृतिक कार्यक्रमांची धूम

मंगळागौर, विविध नृत्याविष्कार, चिमुकल्या कलाकारांचे भजन आणि विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरणाने सांगिर्डेवाडी येथील नवरात्रोत्सवाचा सातवा दिवस उत्साहात साजरा झाला. महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या नृत्य स्पर्धेला महिला व युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, तर बालकलाकारांच्या भजनाने उपस्थित रसिकांची मने जिंकली.

युवा उद्योजक संतोष वालावलकर कुटुंबीय पुरस्कृत ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सी आणि सिद्धिविनायक कॉलनी यांच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवसानिमित्त सांगिर्डेवाडी येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांसाठी नृत्य स्पर्धा, विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण आणि अन्य मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा समावेश होता.

नृत्य स्पर्धेचे उद्घाटन बालकलाकारांच्या उपस्थितीत ओंकार सावंत यांच्या हस्ते शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी धारा वालावलकर, रुही वालावलकर, भूमी शिंदे, आर्या गवस, प्रिशा सातोसकर, प्राजल परब आणि अवनी खंडागळे आदी बालकलाकार उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात वेताळ बांबर्डे-ब्राह्मणवाडी येथील महापुरुष प्रासादिक भजन मंडळाच्या चिमुकल्या कलाकारांनी सादर केलेल्या भजनाने झाली. बालकलाकारांनी आपल्या सादरीकरणातून लोककलेचा सुंदर आविष्कार घडविला. त्यांच्या भजनाने उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले.

त्यानंतर सिद्धिविनायक कॉलनीतील महिलांसाठी नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत युवतींसह महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विविध नृत्यप्रकारांतून सहभागी महिलांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. मंगळागौर आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांमुळे उत्सवात विशेष रंगत निर्माण झाली. विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

नृत्य स्पर्धेचे परीक्षण कथक विशारद व नृत्यांगना मृणाल सावंत, सौ. गंगा वैद्य आणि सौ. बोरकर यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन संतोष वालावलकर यांनी केले.
यावेळी महेश प्रभू, रुपेश पाटकर, योगिता वालावलकर, महेंद्र वालावलकर, संदीप शिंदे, भास्कर वैद्य, तेजल वालावलकर, सीमा शिंदे, पूजा परब, शांभवी परब, दुर्वा बांदेकर, पल्लवी डिगसकर, श्री. तटकरे, सुप्रिया धामापूरकर, सौ. अर्चना करंगुटकर, सौ. पूजा नाईक, सौ. प्रीती पाटकर, नीलम सातोसकर, श्रावणी करंगुटकर यांच्यासह सिद्धिविनायक कॉलनीतील महिला, पुरुष आणि युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवसाच्या नृत्य स्पर्धेचे उद्घाटन करताना बालकलाकार ओंकार सावंत. यावेळी रुही वालावलकर, धारा वालावलकर, भूमी शिंदे व बालकलाकार छाया अजय सावंत उपस्थित होते.

error: Content is protected !!