सरस्वती पूजनानिमित्त पांग्रड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

रांगोळीच्या माध्यमातून दिला जलसंवर्धनाच्या संदेश

कुडाळ : आज सरस्वती पूजनानिमित्त जिल्ह्यातील शाळांमध्ये विविध संस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले होते. अशातच एन व्ही कुलकर्णी . विद्यामंदिर पांग्रड – निरुखे येथे विद्यार्थ्यांनी रेखाटलेली रांगोळी चर्चेचा विषय ठरली आहे.

यावर्षी अल निनो इफेक्टमुळे प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढते. त्यामुळे जगभरातील पावसावर याचा परिणाम होतो. अल निनो इफेक्टमुळे भारताच्या पावसावर परिणाम झाला असून शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्यात यावे असा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.

error: Content is protected !!