कुडाळ तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या सदस्यांकडून बंधारा बांधण्यासाठी ५००० पिशव्यांची मदत

कुडाळ : पालकमंत्री नितेश राणे व जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पाणीटंचाई आपत्ती निवारणाबाबत केलेल्या आवाहनाला कुडाळ तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत बंधारा बांधण्यासाठी उपयुक्त अशा ५००० पिशव्या संकलित करून विस्तार अधिकारी खरात यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी फार कमी प्रमाणात पाऊस झाल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट घोंघावत आहे. या दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून पालकमंत्री नितेश राणे व जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पाणीटंचाई आपत्ती निवारणाबाबत जिल्हावासियांना आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत कुडाळ तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेच्या सदस्यांनी बंधारा बांधण्यासाठी उपयुक्त अशा ५००० पिशव्या संकलित करून विस्तार अधिकारी खरात यांच्याकडे सुपूर्त केल्या.

प्रशासनाने केमिस्ट बांधवांना अशा आपत्ती निवारणाच्या प्रसंगी एक लोगोपयोगी कार्य करण्याची संधी दिल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानण्यात आले. तसेच तालुक्यातील सर्व केमिस्ट बांधवांनी आपली जबाबदारी ओळखून या कामी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!