खोटी बातमी देऊन शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न- बाळा पावसकर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे साळगाव शाखाप्रमुख सचिन धुरी यांची अटक आणि गुन्हा दाखलझाल्याचीखोटी बातमी शिंदेगटाचे कार्यकर्ते पसरवत आहेत.परंतु, कुडाळ पोलीस स्टेशन मधून वस्तुस्थितीची माहिती घेतली असता सचिन धुरी यांना अटक किंवा त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही असे सांगण्यात आले.त्यामुळे खोटी बातमी देऊन शिंदे गटाच्या नेत्यांप्रमाणेच कार्यकर्त्यांकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेनेचे साळगाव शाखाप्रमुख सचिन धुरी हे चांगल्या पद्धतीने शिवसेना पक्षाचे काम करीत आहेत.त्यांच्या रूपाने साळगाव मधून उमदे नेतृत्व पुढे येत आहे. मात्र शिंदे गटाला याची धास्ती असल्यानेच त्यांना कुठेतरी त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष धुरी यांच्या पाठीशी आहे. शिंदे गटाचे कार्यकर्ते सोशल मिडीयाच्या माध्यामातून आमच्या नेत्यांवर देखील खालच्या पातळीची टीका करतात,आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र शिंदे गटाच्या नेत्यांवर कोणी टीका केली तर त्यांना ती सहन करता येत नाही. मग ते रडीचा डाव करून पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी करत आहेत. मग आमच्या नेत्यांवर खालच्या पातळीची टीका होते तेव्हा आम्हीही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रारी करायच्या का? शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा अशा तक्रारी केल्या तर आम्ही देखील त्यांच्या कार्यकर्त्यांवर केसेस दाखल करू. शिंदे गट सत्तेत आहे त्यामुळे जनतेच्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत. परंतु वारंवार अपेक्षा भंग होत असल्याने विरोधी पक्ष तुमच्यावर टीका करणारच आहे.त्या टीका सहन करण्याची ताकद शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे. उठ सुठ पोलीस स्टेशन मध्ये जाऊन विरोधी कार्यकर्त्यांच्या तक्रारी करणे, शासकीय अधिकाऱ्यांकडे ठेकेदारांच्या तक्रारी करणे हे धंदे आता शिंदे गटाने थांबवून जनतेचे खरे प्रश्न सोडवावेत. अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुडाळ उपतालुकाप्रमुख, प्रवक्ते बाळा पावसकर यांनी केली आहे.
1
/
117
Kudal | बैलांच्या अंगावर जखमा, लोकांची गर्दी... पिंगुळीत सुरू असलेल्या झुंजीवर पोलिसांचा छापा!
बैलांच्या अंगावर जखमा, लोकांची गर्दी... पिंगुळीत सुरू असलेल्या बेकायदेशीर झुंजीवर पोलिसांचा छापा!
kudal | योगेश मोबाईल शॉपी कुडाळ - मोबाईलसोबत थार, स्पोर्ट्स बाईक व ₹ 10 लाख जिंकण्याची संधी #kudal
Kudal | ग्रामस्थांच्या मागण्या मान्य होईपर्यंत बिल्डरला काम करू देणार नाही- निलेश राणे | Nilesh Rane
Kudal | तो बिल्डर कोण लागून गेला त्याला तुमच्यासाठी गुडघ्यावर आणू - आ. निलेश राणे | Nilesh Rane
Nilesh Rane | मतदारसंघासाठी अख्ख विधिमंडळ अंगावर घेऊ शकतो | kudal #nileshrane
kudal | जर लोकांना प्रकल्प नको असेल तर गेटवर तुमच्या पुढे राहणारा निलेश राणे असेल | Nilesh Rane
Kudal | जयंत पाटील यांनी काजू बोर्डाचे ३५ कोटी खाल्ले - आ. निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
Kudal Pinguli | राष्ट्रवादी श. प. गटाचे नेते आ. जयंत पाटील यांची पत्रकार परिषद | Jayant Patil
ठाकर आदिवासी कला आंगण येथे पिंगुळी कला महोत्सवाचे आयोजन
Kudal | पाझर तलावाच्या रक्षणासाठी पर्यावरणप्रेमी एकवटले #kudal
Ratnagiri | रत्नागिरीत 'राष्ट्र चिंतन बैठक' यशस्वी संपन्न #ratnagiri
1
/
117


Subscribe








