किनळोस धनगरमाळा येथे वनराई बंधारा संपन्न

वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघ शिवसेना पक्षाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांचा उपक्रम

कुडाळ : वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघ शिवसेना पक्षाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांचे वतीने किनळोस धनगरमाळा येथे आज वनराई बंधारा घालण्यात आला. यावेळी जि. प. सदस्य नागेश आईर, प.स. सदस्या अस्विनी सावंत, माजी सरपंच उदय सावंत, किल्ल्याच्या क. नारूर सरपंच नूतन आईर, निवजे सरपंच महेंद्र पिंगुळकर, निवजे शाखाप्रमुख सीताराम चव्हाण, उपतालुकाप्रमुख संजय सावंत, युवक विभागप्रमुख तुषार परब, बी. एल. ऐ. विभागीय संयोजक सजूराम नाईक, अमित तावडे, आवळेगाव शाखा प्रमुख विनोद सावंत, गिरगांव शाखा प्रमुख सुशील तांबे, कदमवाडी शाखाप्रमुख शिवाजी कदम, हिर्लोक शाखाप्रमुख निनाद परब, वेताळ बांबर्डे शाखाप्रमुख निलेश बांबर्डेकर, रांगणातुळसुली शाखाप्रमुख सुभाष तुळसुलकर, माजी सरपंच कानू शेळके, माजी शाखाप्रमुख चंद्रकांत सावंत, बी. एल. ए. पांडुरंग गावडे, जयराम सावंत, पोलीस पाटील जानकर तसेच प्रकाश सावंत, रवी सावंत, अजय कदम उपस्थित होते.

error: Content is protected !!