बँक ऑफ इंडिया झाराप शाखेतर्फे ग्रामपंचायत सभागृहात आयोजन
झाराप | प्रतिनिधी
बँक ऑफ इंडिया, झाराप शाखेतर्फे ग्रामपंचायत सभागृहात दक्षता जागरूकता अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नागरिकांमध्ये दक्षता, पारदर्शकता आणि भ्रष्टाचारविरोधी जनजागृती निर्माण करणे, तसेच सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची भावना रुजवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मितीसाठी प्रत्येकाने जागरूक राहून पारदर्शक व्यवहारांना प्राधान्य द्यावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या वेळी झारापचे सरपंच मंगेश गावकर, ग्रामसेवक गंगाराम वेंगुर्लेकर, बँक ऑफ इंडिया झाराप शाखेचे प्रबंधक शरद एस., बँकेचे शिपाई गावडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी या अभियानात सहभाग घेत जनजागृतीच्या उपक्रमाला प्रतिसाद दिला.