“गावाच्या विकासासाठी विलास राणे यांचा पुढाकार, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न !”

डिगस ते हुमरमळा चवाटेश्वर मंदिर रस्त्याची स्वखर्चाने साफसफाई

सामाजिक बांधिलकीतून एक स्तुत्य उपक्रम !

कुडाळ : डिगस येथून हुमरमाळा चवाटेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात झाडी वाढली होती. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः रस्त्यावरील वळणांवर झाडीमुळे समोरून येणारी वाहने दिसण्यास अडथळा निर्माण होत होता.

नागरिकांची गैरसोय दूर व्हावी आणि प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, या उद्देशाने श्री. विलास राणे यांनी स्वखर्चाने रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या झाडीची साफसफाई करून घेतली.

error: Content is protected !!