आमदार निलेश राणेंवर आक्षेपार्ह टिप्पणी

युवासेनेचा दणका

उबाठा शाखाप्रमुखाला राहत्या घरातून अटक

कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्यावर सोशल मिडियावरून आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्याला राहत्या घरातून अटक करण्यात आली. सचिन धुरी त्याचे नाव असून ठाकरे सेनेचा साळगाव शाखाप्रमुख असल्याची माहिती आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका डिजिटल वृत्तवाहिनीच्या सोशल मीडिया पेजवर आमदार निलेश राणे यांच्याबाबत वृत्त प्रसारित करण्यात आले होते. या बातमीच्या कमेंट सेक्शनमध्ये sachindhuri84 या अकाऊंटवरून आक्षेपार्ह कमेंट करण्यात आली होती. यावरून शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. संबंधित अकाऊंट धारकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी कुडाळ पोलिसात केली. तसेच युवासेना जिल्हाप्रमुख सरूप वाळके, तालुकाप्रमुख सागर वालावलकर, उपतालुकाप्रमुख विश्वास पांगुळ, संदेश सुकळवाडकर, कुमार राठोड यांनी सबंधित शाखाप्रमुखाचे घर गाठत त्याला जाब विचारला.

अखेर कुडाळ पोलिसांनी संबंधित शाखाप्रमुखाला राहत्या घरातून अटक केली. यावेळी तालुकाप्रमुख विनायक राणे, शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे, पंचायत समिती सदस्य निखिल कांदळगावकर, कुडाळ तालुका संघटक रोहित भोगटे, आबा धडाम, चेतन पडते, प्रथमेश केळबाईकर, प्रथमेश कांबळी, राजवीर पाटील, प्रसन्ना गंगावणे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!