कुडाळ ग्रामीण रुग्णालय रुग्ण कल्याण समिती सदस्य आमदार प्रतिनिधी संजय भोगटे यांनी ग्रामीण रुग्णालयाला दिली भेट

घेतला कामकाजाचा आढावा

कुडाळ : कुडाळ ग्रामीण रुग्णालय रुग्ण कल्याण समिति सदस्य आमदार प्रतिनिधी संजय भोगटे यांनी कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे भेट देऊन कामकाजचा आढावा घेतला. यावेळी रुग्णालायच्या वतीने डॉ. वाळके यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या भेटीमध्ये ग्रामीण रुग्णालयातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी संजय भोगटे यांनी आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील सर्व आरोग्य कर्मचारी व डॉक्टर उपस्थित होते.

error: Content is protected !!