महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विचार विभागाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी इस्माईल युनूस शेख (आय. वाय.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेक्षाध्यक्षांच्या मान्यतेनुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली असून पक्ष संघटना अधिक बळकट करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
कॅप्टन प्रवीणजी डावर यांच्या मान्यतेनुसार इस्माईल युनूस शेख यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विचार विभागाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विचार विभाग अध्यक्ष सय्यद खलील सैफ यांनी नियुक्ती पत्रात नमूद केले आहे तात्काळ प्रभावाने पदभार स्वीकारून पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविणे तसेच संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.
इस्माईल युनूस शेख यांच्या नियुक्ती बद्दल काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिंधुदुर्ग राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद मोडकर, माजी जिल्हाध्यक्ष इर्शाद भाई शेख, विलास गावडे, कुडाळ तालुका अध्यक्ष अभय शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, प्रदेश सदस्य प्रकाश जैतापकर, बँक संचालक प्रसाद बांदेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


Subscribe








