स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई
यापूर्वी पिंगुळी सराफदारवाडी येथे वृद्धेच्या तोंडावर स्प्रे मारून केली होती चोरी
सदर आरोपी कुडाळ येथील
कुडाळ : सोमवार दिनांक 12 ऑक्टोबर 2026 रोजी 18.45 वाजण्याचे मानाने पावशी बेलनदीवाडी येबील सौ. अनिता अशोक अंधारी, वय-50 वर्षे, या पावशी ते घावनळे जाणारे रोडवर पावशी बेलनदीवाडी येथे कुडाळला जाण्यासाठी म्हणून येवून उभी राहीली असता एका अज्ञात इसमाने फिर्यादी यांना घावनळे मठाकडे जाणारा रस्ता कुठे आहे असे विचारून बोलण्यात गुंतवून ठेवून फिर्यादी यांच्या गळयातील 9 ग्रॅम वजनाची सोन्याची माळ खेचुन तोडून त्यातील सुमारे 6 ग्रॅम वजनाची सोन्याची माळ रू. 35,000/- (पस्तीस हजार रुपये) एवढ्या रक्कमेची चोरून घेवून पळून गेला म्हणून दिले फिर्यादीवरुन कुडाळ पोलीस ठाणे गु.र.नं. 341/2026 मा. न्या. संहिता कलम 304(1) प्रमाणे दि. 13.10.2026 रोजी 00.23 वाजता गुन्हा दाखल आहे. तसेच या पुर्वी दि. 09.09.2026 रोजी पिंगुळी सराफदारवाडी, ता. कुडाळ येथे देखील एका वृध्द महीलेच्या घरी जावून मुख्य दरवाजावर थाप मारून दरवाजा उघडल्यावर त्या महीलेच्या तोंडावर स्प्रे मारून तिचे गळयातील 24 प्रेम वजनाचे 40,000/- रू. किमतीचे मंगळसूत्र हिसकावून घेवून जबरी चोरी झालेने त्याबाबत कुडाळ पोलीस ठाणे गु.र.नं. 307/2026 भा. न्या. संहिता कलम 309(6), 115(5), 3(5) प्रमाणे दि. 09.09.2026 रोजी गेलेबाबत गुन्हा नोंद आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सदर दोन्ही सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचे गांभीर्य पाहुन गुन्हयाचे तपास करणेकरीता मा. डॉ. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग व कुमारी नयोमी साटम, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी सदर जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा संमातर तपास करणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेस आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तपास पथके तयार करण्यात आली. त्याप्रमाणे श्री. प्रविण कोल्हे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांचे नेतृत्वाखाली वेगवेगळी पथके तयार करुन त्याद्वारे तपास सुरु होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग च्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी फिर्यादी कडून प्राप्त अज्ञात चोरटयाचे वर्णन, बोलीभाषा व गुन्ह्याचे वेळी वापरण्यात आलेल्या वाहनाचा प्रकार यांची प्राप्त माहितीच्या अनुषंगाने अविरत तपास व चौकशी करुन, तांत्रीक विश्लेषण व गोपनिय माहितीच्या आधारे सोनसाखळी चोरी करणारा संशयीत आरोपी निष्पन्न केला. सदर आरोपीस सापळा रचुन शिताफीने MIDC कुडाळ परीसरातून ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने कसुन तपास केला असता, त्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलीस ठाणे हद्दीतील वर नमूद दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे
कुडाळ पोलीस ठाणे गु.र.नं. 307/2026 भा.न्या. संहिता कलम 309 (6), 115(5), 3(5) मध्ये आरोपी पन्यनाभ रामचंद्र कशाळेकर, वय-47 वर्षे, रा. MIDC, वरची कुंभारवाडी, ता. कुडाळ यांस अटक करण्यात आलेली असुन त्याचेकडुन एकुण 15,500/- रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्याचेकामी वापरण्यात आलेले 1,50,000/- रुपये किमतीची TVS कंपनीची अपाचे R-160 दुचाकी, हेल्मेट व पेन रिलीफ स्प्रे मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला असुन त्याचेकडे अधिक तपास चालु आहे.
सदरची कामगिरी डॉ. मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग व कुमारी नयोमी साटम, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक श्री. प्रविण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक श्री. हनुमंत भोसले, पोलीस अंमलदार सदानंद राणे, डॉमनिक डिसोझा, राजेंद्र गोसावी, आशिष जामदार, अविनाश ओटवणेकर व अमर कांडर सर्व नेमणुक स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग यांनी केलेली असुन त्यांच्या चांगल्या कामगीरीवावत पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.


Subscribe







