कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांची उपस्थिती
दिला वसुंधरा संवर्धनाचा संदेश
कुडाळ : जगद्गुरु श्रीमद् राममंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांचा वसुंधरा दिंडी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी उपस्थिती दर्शवली.
या दिंडी सोहळ्यांमध्ये दिंडीच्या मार्गावर ठिकठिकाणी वृक्षारोपण करून निसर्गसंवर्धांचा संदेश देण्यात आला. आताच्या युगात जग विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. परंतु या विकासाच्या नावाखाली मोठमोठी जंगले उध्वस्त होत आहेत. या सर्वांचे थोड्याफार प्रमाणात परिणाम आपल्याला जाणवत असून भविष्यात आपल्याला मोठ्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते. या दिंडीच्या माध्यमातून वृक्षारोपण करत “पर्यावरणाची करू रक्षा मग पृथ्वीची होईल सुरक्षा” असा संदेश देण्यात आला. या दिंडीमध्ये प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर यांनी स्वतः सहभागी होत वृक्षारोपण केले. आजच्या काळात पर्यावरणाचे रक्षण ही केवळ गरज नसून आपली सामूहिक जबाबदारी आहे. श्रद्धेला निसर्गसंवर्धनाची जोड देणारा हा उपक्रम खरोखरच प्रेरणादाई असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.