आंबडपाल, पावशी, पणदूर येथे दादा साईल यांच्याकडून पंचनाम्यांचा आढावा

वनराई बंधाऱ्यांची पाहणी; जलसंधारणाच्या कामांवर भर

सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी आज आंबडपाल, पावशी व पणदूर येथे भेट देऊन झालेल्या पंचनाम्यांचा आढावा घेतला. यावेळी वनराई बंधाऱ्यांची पाहणी करण्यात आली तसेच नवीन वनराई बंधाऱ्यांच्या बांधणीसंदर्भातही पाहणी करण्यात आली.

जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे स्रोत बळकट करणे आणि पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणे आवश्यक आहे. या दृष्टीने वनराई बंधाऱ्यांची उपयुक्तता लक्षात घेऊन जलसंधारणाच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

शेतीच्या नुकसानीसंदर्भात करण्यात आलेल्या पंचनाम्यांची माहिती घेत स्थानिक परिस्थिती जाणून घेण्यात आली. तसेच पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला.

error: Content is protected !!