पणदूर सिद्धवाडी येथे वनराई बंधारा संपन्न

डॉ. संजाली संजय मालवणकर यांचे विशेष प्रयत्न

कुडाळ : यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात फारच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट घोंघावत आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

पणदूर मयेकर वाडी येथील रहिवासी डॉ. संजाली संजय मालवणकर यांनी स्वतः पुढाकार घेत पणदूर सिद्धवाडी येथे बंधारा बांधला आहे. विशेष म्हणजे नवरात्री उत्सवात कोणाचीही मदत न घेता बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यामुळे हा बंधारा सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. डॉ. संजाली मालवणकर यांनी जलसंवर्धनासाठी उचललेले पाऊल फार महत्वाचे असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

error: Content is protected !!