वैभव नाईक यांच्याकडून व्हायरल ‘त्या’ पत्राचा अर्थ त्यांनी आपल्या सोयीनुसार लावू नये.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांचे प्रत्युत्तर
वैभव नाईक यांनी फेसबुकद्वारे आमदार निलेश राणे यांचे पत्र व्हायरल करत त्यात आपल्या मर्जीतील लोकांना ठेके मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. या पत्रात दर्जेदार काम व्हावे यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे दिसत आहे. तहसीलदार कार्यालय कुडाळ ही इमारत निलेश राणे साहेब खासदार असताना त्यांच्या निधीतून बांधकाम केलेली इमारत आहे. नंतरच्या १० वर्षांच्या काळात या इमारतीवर कुठलाही खर्च माजी आमदार वैभव नाईक यांच्याकडून करण्यात आला नाही, तालुक्याच्या केंद्रस्थानी असलेल्या पण नादुरुस्त आणि गळक्या झालेल्या या इमारतीला सुशोभित आणि वापरायोग्य करण्यासाठी गेल्या वर्षभरात आमदार निलेश राणे यांनी लाखोंचा निधी उपलब्ध करून दिला. नुकताच सेतू सुविधा केंद्रालाही मंजुरी आमदार निलेश राणे यांनी दिली असून यामुळे शासकीय कामांसाठी तहसीलदार कार्यालय कुडाळ येथे येणाऱ्या नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. गुणवत्तापूर्ण कामांसाठी सातत्याने आग्रही असलेल्या आमदार निलेश राणे यांच्या पत्राचा विपर्यास करण्यापेक्षा मतदारसंघात दर्जेदार कामे करण्याचा त्यांचा प्रयत्न पहावा.
दुसऱ्यांवर आरोप करण्याऐवजी वैभव नाईक यांनी स्वतःच्या आमदारकीच्या काळात कोल्हापूरच्या ठेकेदारांवर ठेवलेला वरदहस्त आणि त्यावर वरदहस्तामुळे आज झालेल्या विकास कामांचा खेळ खंडोबा या भागातील जनता जाणून आहे. त्यामुळे स्वतःच्या कार्यकाळात जर कामे दर्जेदार केली असती तर वैभव नाईक यांना जनतेनं नाकारलं नसतं त्यामुळे जनतेला जनतेने आमदार निलेश राणे साहेब यांना दिलेला कौल आणि त्या कौलाचा आदर करून आमदार साहेब या भागाच्या विकासासाठी आणत असलेला कोट्यवधीचा निधी हा या जनतेसाठीच आहे त्याबरोबर या भागातील ठेकेदारांसाठीच आहे परंतु ज्यांनी सातत्याने कोल्हापूर किंवा बाहेरच्या ठेकेदारांचे हित पाहिलं त्यांनी अशा वल्गना करणं हे शोभत नाही त्यामुळे माननीय आमदार साहेबांच्या सहाय्यकाने दिलेलं पत्र हे त्या विकास कामाचा दर्जा राखावा तसेच त्या सोसायटीच्या एकंदरीत कारभाराचा विचार करूनच दिलेला आहे त्या पत्रात कोणत्याही अन्य ठेकेदाराला किंवा सोसायटीला देण्याचा कुठेही उल्लेख नाही याचाही विचार करावा त्यामुळे भविष्यात आमदार निलेश राणे साहेब यांच्या कार्यकर्तृत्वामुळे कोट्यावधीचा विकास निधी येणारच आहे आणि तो दर्जेदार कामावरच खर्च होणार याची खात्री जनतेला असल्यामुळे वैभव नाईक यांना या भविष्यात काही साध्य होणार नाही हे त्रिवार सत्य आहे असे प्रत्युत्तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांनी वैभव नाईकांना दिले आहे.


Subscribe








