वनराई बंधाऱ्यांची पाहणी करत दादा साईल यांनी घेतला पंचनाम्यांचा आढावा

बांबुळी, बाव व सोनवडे येथे दौरा; जलसंधारणाच्या कामांना गती देण्यावर भर

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच जलसंधारणाच्या कामांना गती देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी आज बांबुळी, बाव व सोनवडे येथे भेट देऊन झालेल्या पंचनाम्यांचा आढावा घेतला. यावेळी वनराई बंधाऱ्यांची पाहणी करून नवीन बंधाऱ्यांच्या बांधणीसंदर्भातही आढावा घेण्यात आला.

शेतीच्या नुकसानीसंदर्भात करण्यात आलेल्या पंचनाम्यांची माहिती घेत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच परिसरातील अस्तित्वात असलेल्या वनराई बंधाऱ्यांची पाहणी करून जलसंधारणाच्या कामांची स्थिती जाणून घेण्यात आली. पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरवण्यासाठी नवीन वनराई बंधाऱ्यांची बांधणी करणे आवश्यक असल्याने या कामांवर भर देण्यात आला.

पाणीटंचाईच्या संभाव्य परिस्थितीचा विचार करून जलस्रोतांचे बळकटीकरण, पाण्याची उपलब्धता वाढवणे आणि जलसंधारणाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे. त्यासाठी वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाणी अडवणे व जमिनीत जिरवण्याच्या कामांना प्राधान्य देण्यावर यावेळी भर देण्यात आला.

“पाणी अडवा – पाणी जिरवा” या संकल्पनेतून जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविल्यास भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होईल, असा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!