‘क’ वर्ग पर्यटनांतर्गत श्री. देव रवळनाथ मंदिर सुशोभीकरणासाठी १० लाख मंजूर

आमदार निलेश राणे, खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष प्रयत्न

सरपंच कीर्तिकुमार तेरसे यांनी मानले आभार

कुडाळ : निरुखे गावच्या श्री. देव रवळनाथ मंदिराच्या सुशोभीकरणासाठी ‘क’ वर्ग यात्रस्थळ विकास कार्यक्रम २०२६ – २७ अंतर्गत १० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत निरुखे सरपंच कीर्तिकुमार तेरसे यांनी आमदार निलेश राणे, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले आहेत.

कुडाळ तालुक्यातील निरुखे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसले असून निसर्गाने या गावावर मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केली आहे. या निधीमुळे गावाच्या पर्यटनात्मक विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे. यामुळे ग्रामस्थांमधून समाधानाचे स्वर उमटत असून निरुखे सरपंच कीर्तिकुमार तेरसे यांनी आमदार निलेश राणे, खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!